नवनिर्वाचित नगरसेवकांचा झंवर परिवाराच्या वतीने सत्कार

निवडणूक प्रमुख आमदार राजूमामा भोळे यांचा जाहीर सन्मान
जळगाव प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल विजयी भव: सत्कार समारंभाचे आयोजन झंवर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी महायुतीच्या विजयाचा जल्लोष साजरा करत लोकप्रतिनिधींचा व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे, भागवत भंगाळे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक दीपक सूर्यवंशी, नितीन बरडे, आशाताई पाटील, शुचिता हाडा, दीपमाला काळे, अंकिता पंकज पाटील, मंगलाताई चौधरी, विशाल सुरेश भोळे, चंद्रशेखर अत्तरदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महायुतीच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, आगामी काळात शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. आमदार राजूमामा भोळे यांनी सत्कारबद्दल आभार मानले. झंवर कुटुंबीयांनी आयोजित केलेला हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात पार पडला.









