एमआयएम, अपक्षांनी दिली जोरदार लढत, भाजपच्या घुगेंनी जागा राखली
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १८ आणि १९ मध्ये शिवसेनेने (शिंदे गट) मोठी मुसंडी मारली आहे. या दोन प्रभागांत मिळून शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, इतर जागांवरही शिंदे गटाच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. १ जागा भाजपकडे आली आहे.

प्रभाग १८ (अ): शिवसेनेचे डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग १८ (ब): या जागेवर शिवसेनेच्या नलूबाई तुळशीदास सोनवणे यांनी ३,६०१ मते मिळवून मोठा विजय मिळवला. तापीबाई रणजीत राठोड (शिवसेना ठाकरे गट): १,६१७ मते, यास्मिन खाटीक (अपक्ष): १,३६५ मते,
ज्योती विठ्ठल पाटील (अपक्ष): १,१७७ मते, उज्वला संजय घुगे (अपक्ष): ३०३ मते, वैशाली सुदाम राठोड (मनसे): २५३ मते, नोटा : १८४ मते पडली. प्रभाग १८ (क): शिवसेना शिंदे गटाच्या अनिता सुरेश भापसे २,७०६ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी एमआयएम आणि अपक्ष उमेदवारांच्या आव्हानाचा यशस्वी मुकाबला केला. सुनीता चंद्रकांत भापसे (अपक्ष): १,७९८ मते, शबनम जुबेर पटेल (एमआयएम): १,७५२ मते, अर्चना ललित कोळी (अपक्ष): ८६३ मते, सोनम रोहिदास सोनवणे (शिवसेना ठाकरे गट): ७८२ मते, कुसुम अशोक आठरे (मनसे): ३३३ मते, प्रमिलाबाई चव्हाण (काँग्रेस): २०९ मते, नोटा : १५७ मते मिळाली.
प्रभाग १९ (अ): शिवसेनेच्या रेखा चुडामण पाटील, प्रभाग १९ (ब): शिवसेनेचे विक्रम उर्फ गणेश किसन सोनवणे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग १९ (क): या जागेवर शिवसेना शिंदे गटाच्या निकिता दुर्गेश वंजारी यांनी ७,५३३ मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. अलका राजेंद्र सपकाळ (देशमुख) (राष्ट्रवादी शरद पवार गट): १,९५४ मते, कोकिळा मोरे (अपक्ष): २५४ मते, नोटा : ४३३ मते पडली. तर १९ ङ मध्ये भाजपचे राजेंद्र घुगे पाटील यांनी ५ हजार ८४, अपक्ष उमेश सोनवणे यांना ३ हजार २०० मते मिळाली. १ हजार ८८४ मतांनी घुगे पाटील विजयी झाले. काँगेसचे विशाल पवार २९५, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संग्राम सूर्यवंशी यांना ४१९, अपक्ष किरण गव्हाणे १४८, दिनेश ढाकणे ४८५, गणेश भागवत पाटील २१०, भाजप बंडखोर श्रीकृष्ण वाघ ९२, नोटा २४० मते मिळाली.









