
जिल्हाधिकारी यांची लवकरच बदली होणार ; उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे आश्वासन
जळगाव (प्रतिनिधी) – काल जळगाव जिल्ह्यातील कोरोणा रुग्णालयामध्ये अतिशय धक्कादायक व दु:खद असा प्रकार निदर्शनास आला. या संपूर्ण प्रकाराची माहिती जळगाव जिल्हा एन एस यू आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना दिली.
जळगाव जिल्ह्याला कोरोनापासुन वाचवायचं असेल, तर जिल्ह्याचे प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांची तातडीने बदली करा व त्यांच्या जागी सक्षम व कार्यक्षम असे एखादे जिल्हाधिकारी द्या अशा प्रकारची मागणी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
लवकरच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, डीन डॉ.खैरे यांची होणार बदली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती…
आज जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याशी चर्चा केली असता संपूर्ण जिल्ह्यातील भोंगळ कारभार व जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा व जिल्ह्यातील प्रशासनाचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांचा गेल्या दोन महिन्यांमधील अपयशी कार्यकाळ बघता जिल्हाधिकारी यांची तातडीने बदली करावी व त्यांच्या जागी सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करावी यासंबंधीची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असलेले जिल्हाधिकारी व इतरही अधिकारी यांची तातडीने बदली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लवकरच जिल्हाधिकारी यांची बदली होऊन नवीन जिल्हाधिकारी जळगाव जिल्ह्याला मिळणार आहे .जेणेकरून जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोणाचा उडालेल्या भडक्याला आटोक्यात आणण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे अपेक्षा लागून राहिलेली आहे.








