निष्ठावंत यांची तिकिटे कापल्यामुळे महायुतीमध्ये प्रचंड नाराजी
जळगाव विशेष प्रतिनिधी
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील रुसवा फुगवा आता संपला असून त्यांनी जागावाटप अंतिम केलेली आहे. त्यानुसार पक्षाचे एबी फॉर्म हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत. अनेक प्रस्थापितांना तिकीट कापल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

क्रमांक १ अ मध्ये भाजपाचे रिटा विनोद सपकाळे, १ ब मध्ये दिलीप बबनराव पोकळे, क मध्ये संगीता दांडेकर, ड मध्ये फरदीन फिरोज पठाण हे तिघे शिवसेनेचे निवडणूक लढणार आहेत. क्रमांक २ अ मध्ये सागर श्याम सोनवणे, २ ब मध्ये उज्वला किशोर बाविस्कर हे दोन्ही शिवसेनेचे, क मध्ये पूजा विजय जगताप, ड मध्ये विजय लक्ष्मण बांदल हे दोन्ही भाजपचे आहेत. क्रमांक ३ अ मध्ये भाजपाचे अर्चना संजय पाटील, ३ ब मध्ये प्रतीक्षा कैलास सोनवणे, क मध्ये शिवसेनेचे प्रवीण रामदास कोल्हे, ड मध्ये भाजपाचे निलेश तायडे हे निवडणूक लढणार आहेत.
क्रमांक ४ अ मध्ये भाजपाचे शशीबाई उर्फ शशिकला शिवचरण ढण्डोरे, ४ ब मध्ये विद्या मुकुंदा सोनवणे, क मध्ये कल्पेश कैलास सोनवणे, ड मध्ये शिवसेनेचे पीयूष ललित कोल्हे तर ५ मध्ये अ मध्ये शिवसेनेचे विष्णू रामदास भंगाळे, ५ ब मध्ये मंगला संजय चौधरी, क मध्ये भाजपाचे आशा रमेश पाटील, ड मध्ये यामध्ये नितीन बालमुकुंद लढा हे निवडणूक लढणार आहेत. क्रमांक ६ अ मध्ये टोटल भाजपचे जयश्री अशोक धांडे, ब मध्ये सुचिता अतुलसिंह हाडा, क मध्ये अमित पांडुरंग काळे, ड मध्ये दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांना संधी मिळाली आहे. क्रमांक ७ अ मध्ये भाजपाचे दीपमाला मनोज काळे, ७ ब मध्ये अंकिता पंकज पाटील, क मध्ये भाजपाचे विशाल सुरेश भोळे, ड मध्ये भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे आहेत.
तसेच प्रभाग क्रमांक ८ येथे भाजपाचे अ मध्ये कविता सागर पाटील ब मध्ये मानसी निलेश भोईटे, क मधून अमर मोतीलाल जैन, ड मध्ये सेनेचे नरेंद्र आत्माराम पाटील राजपूत यांना संधी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये अ मध्ये मनोज सुरेश चौधरी, ब मध्ये प्रतिभा गजानन देशमुख हे शिवसेनेच्या तिकिटावर तर क मध्ये भाजपाचे जयश्री राहुल पाटील आणि ड मध्ये डॉ.चंद्रशेखर शिवाजी पाटील भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे.
प्रभाग क्रमांक १० येथे भाजपाचे अ मध्ये सुरेश माणिक सोनवणे, ब मध्ये माधुरी अतुल बारी, क मध्ये कविता किरण भोई, ड मध्ये जाकिर पठाण यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक ११ हा शिवसेनेकडे आला असून प्रभाग क्रमांक १२ हा भाजपकडे गेला आहे. प्रभाग क्रमांक ११ अ मध्ये डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, ११ ब मध्ये संतोष पाटील, क मध्ये सिंधुताई विजय कोल्हे, ड मध्ये ललित विजय कोल्हे हे निवडणूक लढणार आहेत. तर १२ प्रभागामध्ये अ मध्ये अनिल अडकमोल, ब मध्ये उज्वला बेंडाळे, क मध्ये गायत्री राणे, ड मध्ये नितीन बरडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये जितेंद्र मराठे आणि अंजना सोनवणे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. १३ मध्ये अ मधून नितीन सपके, ब मध्ये सुरेखा नितीन तायडे, क मध्ये वैशाली अमित पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून तर ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रफुल्ल गुलाबराव देवकर हे निवडणूक लढणार आहेत.१४ मध्ये अ मधून सुनील सुपडू महाजन, ब मध्ये जयश्री सुनील महाजन, क मध्ये राबियाबी अमजद खान, ड मध्ये रितिक संजय ढेकळे आहेत.
प्रभाग क्रमांक १५ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून अ मधून अरविंद देशमुख, ब मधून चेतन शिरसाळे, क मधून शिवसेनेकडून रेश्मा कुंदन काळे, ड मधून प्रकाश रावलमल बालानी यांना तिकीट मिळाले आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून अ मधून डॉ. विश्वनाथ सुरेश खडके, ब मधून वंदना संतोष इंगळे, क मधून रंजना विजय वानखेडे, ड मधून सुनील वामनराव खडके यांना तिकीट मिळाले आहे.क्रमांक १७ येथे चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार असून येथे अ मधून हिना युनूस पिंजारी, ब मध्ये सुमय्या वसीम पिंजारी, क मध्ये इकबालुद्दीन जीयाउद्दीन पिरजादे आणि ड मध्ये प्रशांत सुरेश नाईक हे निवडणूक लढणार आहे.
प्रभाग क्रमांक १८ हा शिवसेनेकडे गेला असून येथे १८ अ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे, ब मधून नलुबाई तुळशीराम सोनवणे, क मधून अनिता सुरेश भापसे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. १९ प्रभागामध्ये अ मध्ये रेखा चुडामण पाटील, ब मध्ये विक्रम उर्फ गणेश किसन सोनवणे आणि क मधून निकिता अनिल देशमुख हे शिवसेनेच्या तिकिटावर लढणार आहेत तर प्रभाग क्रमांक ड मध्ये राजेंद्र झिपरू घुगे पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी निवडणूक प्रमुख आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.









