महादेव हॉस्पिटल येथे शल्यचिकीत्सा विभागाला यश
जळगाव (प्रतिनिधी) : येथील आकाशवाणी चौकात असलेल्या महादेव हॉस्पिटल येथे एका प्रौढावर नाभीच्या हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. यामुळे रुग्णाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
जळगाव शहरातील ४५ वर्षीय व्यक्तीला पोटाजवळ गाठ होती. त्याबाबत उपचार करून परिणाम दिसत नव्हते. त्यांना नातेवाईकांनी महादेव हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. तपासणीमध्ये शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांना पोटाजवळ नाभीपाशी हर्निया असल्याचे दिसून आले. नाभीची हर्निया म्हणजे पोटातील एखादा अवयव, जसे की आतड्याचा काही भाग किंवा पोटातील चरबी असते. नाभीजवळच्या कमकुवत स्नायूंमधून बाहेर ढकलला जातो. त्यामुळे नाभी किंवा तिच्या आजूबाजूला एक गाठ तयार होते.
त्याकरिता वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी सदर रुग्णाला शस्त्रक्रिया करून दिलासा मिळाला. सदर शस्त्रक्रिया हि शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. शिवाजी सादूलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. परीस वाळे, डॉ. अपूर्वा गवई, डॉ. प्रज्योत कदम यांनी केली. त्यांना बधिरीकरण विभागातील डॉ. भारत सोनवणे, डॉ. मारिया, डॉ. सोनाली, ओटी सहायक असीम शेख, सिद्धिक मण्यार यांनी सहकार्य केले.









