भाविकांची अलोट गर्दी
वावडदे, ता. जळगाव (वार्ताहर) :- एरंडोल ते शेगाव या संत गजानन महाराजांच्या पायी वारीचे ३६ वे वर्ष वावडदे नगरीत मोठ्या भक्तिभावाने साजरे झाले. दिंड्यांचे आयोजक बापू मोरे आणि संत गजानन सेवेकरी यांच्या नेतृत्वाखालील दिंडीचे वावडदे गावातील गौरी उद्योगसमूहावर अत्यंत उत्साहाने स्वागत करण्यात आले.


या मंगलमय प्रसंगी, श्री संत गजानन महाराजांच्या पालखीची स्वागत आरती रविंद्र कापडणे, प्रकाश पाटील आणि जानकीराम पाटील यांनी त्यांच्या परिवारासह केली. महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी आणि स्वागत समारंभात लहु पाटील, सुमित पाटील, आबा गोपाळ, कोमल पवार, विक्रम पवार, प्रमोद पाटील, रतन न्हायदे, गणेश गोपाळ यांच्यासह गावातील अनेक भक्त आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गजानन महाराजांच्या नामघोषाने संपूर्ण वावडदे नगरी दुमदुमून गेली होती.









