प्रभाग १६ मध्ये विकासाची लाट; सौ. प्रतिभा चव्हाण यांच्या प्रचारदौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

चाळीसगाव प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या प्रचारदौऱ्याला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकाला अभिवादन करून सुरू झालेल्या या दौऱ्यात धनगर गल्ली, बाराभाई मोहल्ला, आफू गल्ली, देशपांडे गल्ली आणि आडवा बाजार येथे नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत केले.

दौऱ्यातील प्रत्येक थांब्यावर नागरिकांकडून एकच मुद्दा ठळकपणे समोर आला—प्रभागाला मिळालेली विकासाची नवी चाल. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकारातून उभारलेला संगम सेतू ही या बदलाची ओळख ठरली असून, पूर्वी अवघड ठरत असलेल्या मार्गक्रमणाला आता वेग आणि सुरक्षितता मिळाल्याचे नागरिकांनी समाधानाने सांगितले. प्रगतीची ही दिशा दादांच्या दूरदृष्टीची प्रचिती देणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टिळक चौक, पटार गल्ली, दाळवाली गल्ली, बागवान गल्ली, होळी मैदान, देशमुख गल्ली आणि गुरव गल्ली येथील भेटीतही विकासकामांची चर्चा केंद्रस्थानी राहिली. प्रभागात सकारात्मक बदलांचा नवा अध्याय सुरू झाल्याचा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला.

या प्रचारदौऱ्यात भाजपचे प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेवकपदाचे उमेदवार अनुक्रमे १ राजपूत विरेंद्रसिंग (टोनू) महेंद्रसिंग आणि अनुक्रमे २ वैशाली एकनाथ पगार यांचा परिचय आणि संवादही झाला. नागरिकांनी दाखवलेला उत्साह, ऐक्य आणि विश्वास हा आगामी निवडणुकीतील महत्त्वपूर्ण विजयाची चाहूल देणारा असल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १६ च्या सर्वांगीण प्रगतीसाठी संगम सेतूसारखी महत्त्वाकांक्षी कामे पुढे नेण्यासाठी आणि ‘द बेस्ट चाळीसगाव’ उभारण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजप उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी यावेळी नागरिकांना केले









