जळगाव : हरीविठ्ठलनगर परिसरात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गॅलरीत ठेवलेला लॅपटॉप चोरट्याने खिडकीतून हात घालून उचलल्याची घटना समोर आली आहे. योगेश गौतम सपकाळे (२६) शिक्षणासाठी वापरत असलेला लॅपटॉप गॅलरीत ठेवलेला असताना चोरट्याने संधी साधून तो चोरून नेला. अंदाजे ३४ हजार रुपये किमतीच्या या उपकरणाबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस नाईक मनोज सुरवाडे करीत आहेत.









