जळगावः एमआयडीसीतील महालक्ष्मी इंडस्ट्रिज समोरून एका व्यापाऱ्याच्या मालकीच्या ४० हजार रूपये किंमतीच्या तीन गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २७नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील महालक्ष्मी इंडस्ट्रिज समोर मोहन अशोक पाठक (वय ४६) रा. रिंग रोड, जळगाव यांच्या मालकीचे दोन
गायी आणि एक गोऱ्हा हे गुरे २५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधी बांधलेले होते. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही गायी व गोऱ्हा मध्यरात्री चोरून नेला. हा प्रकार बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आला. याप्रकरणी मोहन पाठक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील हे करीत आहे.









