जळगाव (प्रतिनिधी):- टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. पै. तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण (सातारा) येथे आयोजित करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या १००० हून अधिक युवकांच्या नेतृत्व शिबिरामध्ये जळगाव येथील ‘आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन’चे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना त्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ‘आरोग्यदूत पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.


शिवभक्त पै. अनिकेतभाऊ घुले, टायगर ग्रुप तसेच शिवजल ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात जितेंद्र पाटील यांचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे.
सामाजिक कार्याला प्रेरणा: यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात असे मत व्यक्त केले की, एका समर्पित सामाजिक कार्यकर्त्याला मिळालेल्या या पुरस्कारामुळे तरुणांसमोर एक उत्तम उदाहरण प्रस्तुत होईल. तसेच, यामुळे तरुणांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळून समाजाचा विकास साधण्यास मदत होईल.
एक उत्तम सामाजिक कार्यकर्ता आणि लोकसेवक म्हणून ओळख असलेल्या श्री. पाटील यांना हा बहुमान मिळाल्याने आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.









