• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्तूल, तलवारी जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्तूल, तलवारी जप्त

चोपडा शहर पोलीस स्टेशनची कारवाई ; नांदेड, संभाजीनगरसह स्थानिक गुन्हेगारांचा समावेश

जळगाव ( प्रतिनिधी ) – चोपडा शहरात मध्यरात्री धोकादायक व प्राणघातक हत्यारे घेऊन रस्तालुटीच्या उद्देशाने थांबलेल्या सात सराईत गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून गावठी पिस्तूल, तलवारी आणि १३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.

दिनांक २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना शिरपूर बायपास रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये काही संशयित व्यक्ती थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ पोलीस पथक तयार करून रणगाडा चौकाच्या पुढे, बायपास रोडवर पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट डिझायर कार (क्र. एम एच २६ सी एच १७३३) थांबलेली आढळली. कारच्या बाहेर दोघे लक्ष ठेवून उभे असलेले आणि आतमध्ये पाच जण बसलेले, असे एकूण सात संशयित पोलिसांना आढळले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ घेराव घालून सातही आरोपींचा पाठलाग करून त्यांना अटक केली आहे.

झडतीदरम्यान, दोन संशयित आरोपींच्या कमरेला लोड केलेले गावठी कट्टे, गाडीत दोन तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन मिळून आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिलीपसिंह पवार, विक्रम बोरगे, अनिकेत सूर्यवंशी, अमनदीपसिंग राठोड, सद्दाम हुसेन (सर्व रा. नांदेड, संभाजीनगर) आणि चोपडा येथील अक्षय महाले व जवेश महाजन या सात गुन्हेगारांचा समावेश आहे. चौकशीत या आरोपींवर यापूर्वी नांदेड, संभाजीनगर (वैजापूर) आणि चोपडा येथे खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजविणे आणि अग्निशस्त्रे बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींपैकी दोघे नुकतेच एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेतून बाहेर आले आहेत, तर एक आरोपी दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता.

या आरोपींची नांदेड परिसरात मोठी दहशत असून, ते शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करणे, खंडणीसाठी अपहरण करणे आणि लोकांचा छळ करून त्यांचे व्हिडिओ तयार करून धमकी देणे अशी कृत्ये करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक महेन्द्र रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व पथकातील सपोनि एकनाथ भिसे, पोहेकॉ हर्षल पाटील, पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकॉ ज्ञानेश्वर जयागे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल मदन पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र मंदे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, चालक पोहेकॉ किरण धनगर, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ प्रकाश ठाकरे यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आहेत.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

टायर फुटल्याने बसचा भीषण अपघात : महिला प्रवासी चाकाखाली चिरडून जागीच ठार

Next Post

सिझेरियननंतर काही दिवसांनी पोट फुटून महिला झाली अत्यवस्थ शल्यचिकित्सकांच्या तत्परतेने वाचले प्राण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सिझेरियननंतर काही दिवसांनी पोट फुटून महिला झाली अत्यवस्थ शल्यचिकित्सकांच्या तत्परतेने वाचले प्राण

सिझेरियननंतर काही दिवसांनी पोट फुटून महिला झाली अत्यवस्थ शल्यचिकित्सकांच्या तत्परतेने वाचले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon