• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कौटुंबिक कारणातून नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कौटुंबिक कारणातून नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव शहरातील सुंदर मोती नगरातील घटना, माहेरच्या मंडळींचा आक्रमक पवित्रा

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सुंदरमोती नगरात राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेने कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १० सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मयुरीने राहत्या घरात गळफास घेऊन केल्याची घटना बुधवार दि. १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे तिच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला.

मयुरी गौरव ठोसर असे मयत विवाहितेचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील मूळ रहिवासी असलेल्या मयुरीचा विवाह १० मे रोजी जळगावातील गौरव ठोसरसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच तिचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींकडून छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. इतकंच नव्हे, तर तिच्याकडून पैशांची मागणीही केली जात होती. मयुरीचा पती गौरव हादेखील तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगितलं. या त्रासाला कंटाळून मयुरीने तिच्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली.

त्यांनी काही पैसे देऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण काही दिवसांनी पुन्हा छळ सुरू झाला. मयुरीचा वाढदिवस ९ सप्टेंबर रोजी होता. तिच्या भावाने वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला पैसे दिले होते आणि तो साजराही झाला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी, १० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता, घरात कुणी नसताना मयुरीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

या घटनेची माहिती मयुरीचे वडील भगवान बुडूकले यांना मिळताच, ते कुटुंबासह ११ सप्टेंबर रोजी जळगावात दाखल झाले. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर मयुरीची आई, वडील आणि भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला. आपल्या मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप करत त्यांनी पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

दाल व्यापाऱ्याची ३६ लाख ३९ हजारांची फसवणूक; ४ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

दाल व्यापाऱ्याची ३६ लाख ३९ हजारांची फसवणूक; ४ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!
1xbet russia

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

February 16, 2026
मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

मामला वीस लाखांच्या खंडणीचा,  भाचाला डांबून ठेवत मामाला पैसे आणण्यासाठी पाठवले जळगावात!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon