चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगिरी
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाने नागपुर शहर येथील हिगंणा पो स्टे येथील फरार आरोपीतास शिताफिने ताब्यात घेवुन नागपुर शहर येथील हिंगोणा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
दिनांक ३० ऑगस्ट रोजी हिंगणा पो.स्टे. नागपूर शहर येथील गुन्ह्यातील पोलीस कस्टडी रिमांडमधील आरोपी गणेश भिकन गोसावी (वय २०, रा. विखरण, ता. एरंडोल, जि. जळगाव) याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस अंमलदार घेऊन जात असतांना, पोलिसांच्या रखवालीतून पळून गेला होता. त्याबाबत हिंगणा पो.स्टे. नागपूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी याची गोपनिय माहिती काढली असता, आरोपी हा डोण, ता. चाळीसगाव येथे त्याचा मावस भाऊ याच्याकडे आला असल्याची माहीती मिळाली.
त्यावरुन पोलीसांनी सापळा रचून नमूद आरोपी यास शिताफीने ताब्यात घेऊन हिंगणा पो.स्टे. नागपूर शहर यांचे ताब्यात दिले आहे. ही कारवाई महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक, कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, विजयकुमार ठाकुरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांचे नेतृत्वाखाली पोउनि. राहुल राजपुत, सफौ युवराज नाईक, पोहेकॉ संदिप पाटील, पोहेकॉ औंकार सुतार, पोकों विजय पाटील, पोकों सुनिल पाटील यांनी केली आहे.