जळगावच्या कोरोनाबाधित रुग्नांची हजाराकडे वाटचाल ; ९९६ झाली संख्या
जळगाव ;- जिल्ह्यात आज पुन्हा नव्याने कोरोना संशयितांची ३९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहेत . त्यानुसार असून रुग्ण संख्या ९९६ वर पोहचली आहे . जळगाव ३,अमळनेर १३, रावेर ४, एरंडोल २ , फैजपूर १ ,भडगाव १ ,जामनेर ३ , भुसावळ ५ ,चोपडा ६ , धरणगाव १ असे एकूण ३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत . अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे . काल ५० रुग्नांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते . तसेच ११५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . ३९२ रुग्ण उपचार घेत असून ४४८ जण कोरोनामुक्त होऊन घरी बरे होऊन परतले आहेत . ४० रुग्ण अत्यवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .
घरी राहा , सुरक्षित राहा ! विनाकारण घराबाहेर पडू नका !