एरंडोल (प्रतिनिधी)- तालुक्यातील पातरखेडे येथे एका 42 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे. कांतीलाल मच्छींद्र पाटील (वय-42) असे मयताचे नाव असून त्याने घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना आज दुपारी घडली, याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास विकास देशमुख, राजु पाटील, अमीत तडवी करीत आहेत.









