जळगाव तालुक्यातील भोकर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भोकर येथील तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून घेत गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. ५ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली आहे. शरीराला आलेल्या दिव्यांगत्वामुळे ते नैराश्यात होते, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर प्रल्हाद पाटील (वय ३५, रा. भोकर ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ यांच्यासह राहत होता. शेती करून तो परिवारासाठी आर्थिक मदत करीत होता. (केसीएन)दरम्यान, शनिवारी दि. ५ रोजी दुपारी घरी कोणी नसताना साधारण ४ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील याने छताला गळफास लावून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले. कुटुंबीयांनी तात्काळ ज्ञानेश्वर याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. तर भोकर गावात तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे शोककळा पसरली आहे. दिव्यांगत्वास कंटाळून ज्ञानेश्वर पाटील यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.