शिरसोली येथे उपक्रम
शिरसोली (वार्ताहर) :- येथील बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते.
प्रमुख अतिथी ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे ,सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी, देवका पाटील, घनश्याम काळे, नेत्रा वाणी हे उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर दीपक कुलकर्णी, सुनील भदाणे , घनश्याम काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवका पाटील यांनी केले तर आभार नेत्रा वाणी यांनी मानले.