श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
जळगाव ( प्रतिनिधी ) – क्रांतीसूर्य शूरवीर महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त,भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती (भुसावळ) यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि लघुउद्योजकांना गौरवून त्यांच्या यशाचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा शुक्रवार, दि. २७ जून रोजी सकाळी १० वाजता, स्टार लॉन्स, भुसावळ येथे होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, अध्यक्ष, सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट,फैजपूर ,अँड. शिलाभाभीसा सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय अध्यक्षा, राष्ट्रीय राजपूत करणी सेना,योगेंद्रसिंह कट्यार, राष्ट्रीय उपाध्यक्ष, संजय सावकारे, मंत्री, महाराष्ट्र राज्य, आमदार किशोर पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार तर लघुउद्योजकांनी समाजात निर्माण केलेल्या यशाचा गौरव करण्यात येणार आहे.
तरी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य संयोजक आनंदसिंह ठोके, राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय राजपूत करणी सेना प्रवीणसिंह राजपूत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,विलास सिंह पाटील खान्देश विभाग प्रमुख ,स्वागतोत्सुक दामोदर सिंह राजपूत प्रदेश उपाध्यक्ष,राजपूत करणी सेना,संदीप सिंह राणा युवा जिल्हा प्रमुख व महाराणा प्रतापसिंह उत्सव समिती भुसावळ व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांनी केले आहे.