पाचोरा तालुक्यात खेडगाव नंदीचे येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील २५ वर्षीय शेतकरी तरुणाचा शनिवारी दि. १४ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मोहित जगतसिंग पाटील (वय २५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मोहित याचे पश्चात आई, वडिल, एक बहिण असा परिवार आहे.(केसीएन)शेतीकामावर पाटील परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता. घटना गावाजवळील मोहित यांच्या शेतात घडली. मोहित पाटील हा त्याच्या शेतात शनिवारी दि. १४ रोजी दुपारी पेरणी करण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहित यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.(केसीएन)या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. अतिशय मनमिळाऊ व शांत स्वभावाचे मोहित याचे अकस्मात मृत्यूने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









