नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाही. त्यातच देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या मजुरांना केंद्र सरकारने आपल्या घरी जाण्यासाठी श्रमिक रेल्वेची सोय केली आहे. मात्र घरी जाऊन देखील काही मजुरांचे हाल संपत नाहीत. कारण आसाममधील एका तरुणाला कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही क्वारंटाईन करण्यात आले तेही एका झाडावर. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.

तामिळनाडूमधून आसामला आलेल्या एका तरुणाला गावकऱ्यांनी झाडावर क्वारंटाईन केले. आमोष बासुमत्री असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण तामिळनाडूमध्ये एका कंपनीत कमला होता. कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन करण्यात आल्याने तो ज्या कंपनीत तिथे त्याला नुकसान झाले. त्यामुळे तो परत आपल्या गावी काही दिवसापूर्वी आला.
तो गावी सोनीतपूरच्या देखियाजुली शहरात त्याला १ दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, त्याचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र घरी आल्यानंतर त्याला गावकऱ्यांनी गावात घेतले नाही. एवढेच नाही तर त्याला १४ दिवस झाडावर क्वारंटाईन करून ठेवले आहे.







