• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ट्रकच्या धडकेत हात गमावलेल्या प्रौढाला १२ लाख ५० हजाराची नुकसान भरपाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ट्रकच्या धडकेत हात गमावलेल्या प्रौढाला १२ लाख ५० हजाराची नुकसान भरपाई

मोटार अपघात दावा प्राधिकरणात दावा मंजूर

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील संजय मधुकर इंगळे यांना एका रस्ता अपघातात आपला उजवा हात गमवावा लागला होता. या अपघातातील नुकसान भरपाईपोटी त्यांना मोटार अपघात दावा प्राधिकरणाने तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. अपघातामुळे झालेले अपंगत्व, औषधोपचाराचा खर्च आणि कृत्रिम हात बसवण्याचा व त्याच्या देखभालीचा खर्च मिळून एकूण १२ लाख ५० हजार रुपयांची भरपाई संजय इंगळे यांना मिळाली.

संजय इंगळे यांचा ३० जानेवारी २०२४ रोजी एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाला होता. ते काम संपवून खेडी रोडवरील गौरव हॉटेलसमोरून पायी चालले जात असताना, छत्तीसगड येथील बलकारसिंग हरदेवसिंग या ट्रक चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात ट्रक चालवत त्यांना अगदी जवळून ओव्हरटेक केले. ट्रकच्या डुकमध्ये त्यांचा उजवा हात अडकला आणि तो दंडापासून पूर्णपणे तुटला. या गंभीर अपघातामुळे संजय इंगळे यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा उजवा हात दंडापासून कापावा लागला. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आणि ट्रक चालक हरदेवसिंग याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

अपघातामुळे आलेले कायमस्वरूपी अपंगत्व आणि औषधोपचाराचा खर्च भरून काढण्यासाठी संजय इंगळे यांनी जळगाव येथील मोटार अपघात दावा प्राधिकरण येथे ॲड. महेंद्र सोमा चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. अपघातामुळे त्यांना १ लाख ३ हजार रुपयांचा औषधोपचाराचा खर्च आला होता आणि ८० टक्के अपंगत्व आले होते. अपघातापूर्वी ते वाहनचालक म्हणून नोकरी करत होते, परंतु हात गमावल्याने त्यांची उपजीविकेचे साधनही हिरावले गेले होते, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडला.

विशेष म्हणजे, संजय इंगळे यांनी कृत्रिम हात बसवण्यासाठी येणारा अंदाजित खर्च आणि त्याच्या देखभालीचा खर्चही नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट करण्याची विनंती कोर्टात केली होती. या सर्व बाबींचा विचार करून, १० मे रोजी झालेल्या लोक अदालतीमध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने चर्चेअंती १२ लाख ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सहमती दर्शविली. या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने ॲड. महेंद्र सोमा चौधरी, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी, ॲड. हेमंत जाधव आणि ॲड. सुनील चव्हाण यांनी कामकाज पाहिले. हे प्रकरण लोक अदालतीच्या पॅनल क्रमांक १ चे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-२ बी. एस. वावरे यांच्यासमोर निकाली काढण्यात आले.


 

Tags: #jalgaon cort news#jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये लॅम्प लाइटिंग व शपथविधी समारंभ संपन्न

Next Post

हळदीच्या कार्यक्रमाला जाताना भरधाव कार पुलावरून कोसळली, चोपड्याचा तरुण ठार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

हळदीच्या कार्यक्रमाला जाताना भरधाव कार पुलावरून कोसळली, चोपड्याचा तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon