• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऐकावे ते नवलच, चक्क पीएसआय आले चोरट्यांसोबत चोरी करायला..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ऐकावे ते नवलच, चक्क पीएसआय आले चोरट्यांसोबत चोरी करायला..!

चोपडा बसस्थानक परिसरात एलसीबीसह स्थानिक पोलिसांनी केली चौघांना अटक

चोपडा ( प्रतिनिधी ) – अनेक वेळेला आश्चर्यचकित करणाऱ्या बाबी पोलीस तपासात समोर येत असतात. अशीच एक घटना बुधवारी समोर आली आहे. चक्क चोरी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकच चोरट्यांच्या टोळीसोबत आल्याचे दिसून आले आहे. चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करण्यासाठी टोळीसोबत आलेल्या जालना पीएसआयचा स्थानिक गुन्हे शाखेसह चोपडा पोलिसांनी पर्दाफाश केला.

पळून जात असतांना या पथकाने प्रल्हाद पिराजी मालटे (वय ५८, रा. सदर बाजार, जालना) या पीएसआयसह तिघ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात सहभागी असलेला पीएसआय तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यापुर्वीच त्यांच्या कारनामांचा भांडाफोड झाला आहे.(केसीएन) चोपडा शहरातील बस स्थानक परिसरात बाहेर जिल्ह्यातील टोळीकडून गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने आणि पैसे लांबवित असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे पथक संशयितांच्या मागावर होते.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पथक बस स्थानक परिसरात सापळा रचून बसलेले होते. दरम्यान, चोरीच्या उद्देशाने आलेली टोळी पळून जात असतांना त्यांना ही टोळी (एमएच ४३, २९२८) क्रमांकाच्या चारचाकीतून पसार झाल्याची माहिती पथकाला मिळाली.(केसीएन)त्यानुसार पथकाने धरणगाव नाक्यावर सापळा रचत पळून जाणाऱ्या टोळीला अडविले. या वाहनात टोळीसोबत असलेले जालना येथील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मालटे हे देखील मिळून आले.

बस स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीतील श्रीकांत भिमराव बघे (वय २७ रा. गोपाल नगर, खामगाव), अंबादास सुखदेव साळगावकर (वय ४३ रा. माना, ता. मूर्तिजापुर जि. अकोला), रउफ अहमद शेख (वय ४८, रा. महाळस, जि. बीड) यांच्या मुसक्या आवळल्या. (केसीएन)यातील अंबादास साळगावकर याच्यावर तब्बल २७ चोरीचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई चोपडा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, जितेंद्र वल्टे, पोहेकॉ विलेश सोनवणे, दिपक माळी, रवींद्र पाटील, पोना हेमंत पाटील यांच्या पथकाने केली.

जालना पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रल्हाद मानटे यांना चोरट्यांच्या टोळीसोबत चोरी करण्यासाठी येतांना पथकाने ताब्यात घेतले. उपनिरीक्षक मानटे यांच्या सेवानिवृत्तीला अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. उपनिरीक्षक सदर बाजार परिसरातील बस स्थानकावर ड्युटीवर असतांना त्यांची या संशयितांसोबत ओळख झाली. तेथूनच हे त्यांच्या संपर्कात असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharatऐकावे ते नवलचचक्क पीएसआय आले चोरट्यांसोबत चोरी करायला..!
Previous Post

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

Next Post

पुन्हा दुसरी घटना : किनगावनंतर आता डांभुर्णीत चिमुकलीला बिबट्याने केले ठार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुन्हा दुसरी घटना : किनगावनंतर आता डांभुर्णीत चिमुकलीला बिबट्याने केले ठार !

पुन्हा दुसरी घटना : किनगावनंतर आता डांभुर्णीत चिमुकलीला बिबट्याने केले ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon