• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, एकाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

एरंडोलच्या गांधीपुरा येथील घटना

एरंडोल ( प्रतिनिधी ) :- नातीची सायकल का फेकली याचा जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना दि. २ एप्रिल रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. संशयिताने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याचेवर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

गांधीपुरा भागातील रहिवासी माजी नगरसेवक सुभाष सोनू मराठे यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या नातींच्या सायकली राहत्या घराच्या ओट्यावर लावल्या होत्या. त्याचवेळी गल्लीत राहणारे करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार, सनी संदानशिव, लकी संदानशिव या तिघांमध्ये वाद सुरु झाला. तिघांमध्ये भांडण सुरु असतांना त्यांनी सुभाष मराठे यांच्या ओट्यावर लावलेल्या सायकली फेकून दिल्या. सायकली फेकल्यानंतर देखील सुभाष मराठे तिघाही तरुणांना काहीही बोलले नाहीत.

बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सुभाष मराठे व त्यांचा मुलगा अतुल मराठे यांनी काल तुम्ही सायकली का फेकल्या असे विचारले. याचा राग आल्याने तिघाही संशयितांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करून वाद घालत असतांनाच संशयित लकी संदानशिव याने त्याचेजवळ असलेल्या धारदार शस्त्राने अतुल मराठे याच्या पाठीवर आणि हातावर दोन वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये अतुल मराठे गंभीर जखमी झाला. सुभाष मराठे यांनी आरडाओरड केल्यामुळे गल्लीतील उल्हास लोहार, हर्शल पाटील, अंकुश मराठे,हर्शल वंजारी घटनास्थळी आले आणि त्यांनी गंभीर जखमी झालेल्या अतुल मराठे यास पद्मालय हॉस्पिटल येथे नेले.

पद्मालय हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत सुभाष मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघाही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत. हल्ल्यात जखमी झालेले अतुल मराठे शिवसेनेच्या गांधीपुरा विभागाचे शहरप्रमुख आहेत.दरम्यान संशयित आरोपी करण उर्फ विजय ज्ञानेश्वर केदार यास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.


 

 

Tags: #erondol crime news #maharashtra
Previous Post

यावल महाविद्यालयात पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन

Next Post

दुचाकी अपघातप्रकरणी खोटी माहिती, इन्शुरन्स कंपनीतर्फे गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

दुचाकी अपघातप्रकरणी खोटी माहिती, इन्शुरन्स कंपनीतर्फे गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा..

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon