रुग्णालयाला भेट देऊन केले कौतुक
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रिंगरोड येथील पियूष हॉस्पिटल येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी दि. २३ मार्च रोजी सस्नेह भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील उत्कृष्ट रुग्णसेवेबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत रविवारी भुजबळ यांनी सकाळी ११ वाजता रिंग रोड येथील पियूष हॉस्पिटल येथे सस्नेह भेट दिली. सुरुवातीला संचालक डॉ. रोहन पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पियुष हॉस्पिटलच्या प्रेमपूर्वक स्वागताने छगन भुजबळ भारावून गेले. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील सर्व सुविधांची माहिती घेतली.
तसेच अत्याधुनिक सेवा सुविधा पाहून त्यांनी डॉ. रोहन पाटील यांचे कौतुक केलं. रुग्णालयात आतापर्यंत विविध रुग्णांवर केलेल्या उपचार पद्धतीबाबत डॉ. रोहन पाटील यांनी छगन भुजबळ यांना माहिती दिली. हॉस्पिटलमधील उत्तम रुग्ण सेवा देत असल्याबद्दल सर्व डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ भरत बोरोले, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ प्रफुल्ल काबरा, डॉ. किरण सोंडगे, समता परिषदेचे बापू भुजबळ, बाळासाहेब कर्डक, वसंत पाटील, मराठा प्रीमियर लीगचे राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.