• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आ. एकनाथराव खडसे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आ. एकनाथराव खडसे

लेवा पाटीदार समाजातर्फे सामुहिक विवाह सोहळ्यात लागले २३ विवाह

जळगाव (प्रतिनिधी) : सध्या विवाहांमध्ये होणारा खर्च टाळणेसाठी सद्यपरिस्थितीत सामुहिक विवाह सोहळा ही एक काळाची गरज बनलेली आहे. समाजाची बांधीलकी जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन आपले योगदान दिले पाहिजे. वधूवरानी भविष्यात कुरबुरी न करता समजंसपणे संसार करावा, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आ. एकनाथराव खडसे यांनी केले.

लेवा एज्युकेशनल युनियन, जळगांव, अखिल भारतीय लेवा युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील वधु – वरांचा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन दि. २३ मार्च रोजी सकाळी लेवा बोर्डीगचे प्रांगणात करण्यात आले. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये एकुण २३ वधु वरांचा सहभाग होता. लेवा पाटीदार समाजामध्ये १९९५ नंतर मोठ्या प्रमाणात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन जळगांव शहरात करण्यात आले.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी आ. एकनाथराव खडसे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, कुटुंबनायक ललित पाटील, भोरगाव लेवा पंचायतीचे सचिव ॲड. संजय राणे, लेवा एज्युकेशनल युनियनचे उपाध्यक्ष उल्हासशेठ चौधरी, सचिव प्रा. व. पु. होले, ॲड. प्रकाश पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणीताई खडसे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील, माजी महापौर आशाताई कोल्हे, सिंधुताई कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ॲड. केतन ढाके आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला चिमुकले राम मंदिर येथून सर्व नवरदेवांची वरात ही वारकरी संप्रदायामधील वारक-यांच्या दिंडीसोबत सकाळी १० वा. निघाली होती. मार्गात पावली खेळून वर्हाडी मंडळींनी उत्साह आणला. नंतर विवाह स्थळी लेवा बोर्डीग येथे नवरदेवांचे स्वागत करण्यात आले. मंडपात आल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात सर्व २३ जोडप्यांचा विधिवत विवाह सोहळा पार पडला. यानंतर मंचावर मान्यवरांनी येऊन दीपप्रज्वलन करीत देवतांसह समाजातील मान्यवरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.

यावेळी ॲड. संजय राणे यांना नुकताच परदेशात उच्चस्तरीय सन्मान देऊन गौरव करण्यात आल्याबद्दल समाजातर्फे जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. आ. राजूमामा भोळे म्हणाले की, उपक्रम कौतुकास्पद असून प्रत्येक समाजात विवाह सोहळ्यातील वाढत्या अनिष्ठ रूढी आणि पैशांचा व वेळेचा अपव्यय बघता समाजमंडळांनी अशा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. यातून गोरगरीब परिवारातील उपवर मुलामुलींचे विवाह अल्प खर्चात पार पडतात. यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होते, असेही आ. भोळे म्हणाले.

सामूहिक विवाह संमेलनातून सामाजिक हित साधले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मदत आणि आधार देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहेत. समाजातील मोठ्या, साधनसंपन्न व्यक्तींनीही आपल्या कुटुंबातील मुलामुलींच्या विवाहासाठी अशा संमेलनांमध्ये पुढे यावे, असे आवाहन यावेळी कुटुंबनायक ललित रमेश पाटील यांनी केले. या प्रसंगी सर्व वधु – वरांना संसारसाठी लागणारे आंदण (भांडी) व इतर गृहपयोगी वस्तु देण्यात आली आहे.

प्रास्ताविक ॲड. संजय राणे यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती भोळे, आणि वैशाली झोपे यांनी केले. आभार ॲड. प्रकाश पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी लेवा एज्युकेशनल युनियन, जळगांव, अखिल भारतीय लेवा युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड, जळगांव यांचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आ. एकनाथराव खडसे
Previous Post

शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहीम: अमळनेर तालुक्यात दहा रस्ते खुले

Next Post

लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा – डॉ. अण्णासाहेब टेकाळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा – डॉ. अण्णासाहेब टेकाळे

लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा – डॉ. अण्णासाहेब टेकाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon