जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील पुष्पलता नगरातील ३८ ए या खुल्या जागेमध्ये अनुसूचित जाती जमाती मधील नागरिकांना सामाजिक व आर्थिक कार्यासाठी सामाजिक सभागृह उभारणी करिता जागा मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच खुल्या जागेत विहार बांधण्यास परवानगी मिळावी अशीही मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. काही नागरिक विनाकारण त्रास देत असून त्या ठिकाणी विहार बांधण्यासाठी मज्जाव करीत आहेत.
तसेच काही नागरिक विनाकारण शिवीगाळ करून समाजाच्या भावना दुखावत आहेत असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर स्वाती तुषार इंगळे, साधना विनोद तायडे, सुनिता अनिल जोहरे, कीर्ती प्रवीण तायडे, वर्षा विजय सोनवणे, ज्योती विनोद इंगळे, ज्योती अशोक खरताडे, पंडित गेदु तायडे, प्रशांत विश्वनाथ निकम, संजय पंडित तायडे, उज्वला संजय तायडे, कीर्ती प्रवीण तायडे ,चंद्रकला इंगळे आदि नागरिकांच्या स्वाक्षरी आहे.