रावेर तालुक्यात विवरा येथे सुरु आहे शिक्षक प्रशिक्षण
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, स्टार्ट व समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक यांचे प्रशिक्षण रावेर तालुक्यातील विवरा येथील बेंडाळे हायस्कूल येथे सुरु आहे. या प्रशिक्षणाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल झोपे, सी.डी. साळुंखे व त्यांची सहकाऱ्यांनी या प्रशिक्षण केद्रास भेट देवून समाधान व्यक्त केले आहे.
या प्रशिक्षणासाठी अनिल झोपे यांनी मार्गदशनपर सुचना केल्या आहेत. त्याचबरोबर येथील रावेर गटशिक्षणाधिकारी विलास कोळी, प्रशिक्षक समन्वयक म्हणून पी. आर. मानकर यांनी सुद्धा मार्गदर्शन करून पुढील सुचना केलेल्या आहेत .