पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तालुका स्तरीय पाककृती स्पर्धा घेण्यात आली. पालक, स्वयंपाकी यांचा यामध्ये सहभाग होता. फोर्टिफाईड तांदूळबाबत जनजागृती करणे, तृणधान्याचे महत्व विद्यार्थ्यांना लक्षात आणून देणे या उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी सरला पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, प्रशासन अधिकारी खलील शेख, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले उपस्थित होते. परीक्षक म्हणुन प्राचार्या मानसी भदादे, बाल विकास पर्यवेक्षिका अर्चना धामोरे, उपशिक्षिका रुपाली पाटील यांनी कामकाज पाहिले. प्रास्ताविक शापोआ अधीक्षक विजय पवार यांनी केले. स्वप्नील बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन मानसी भदादे यांनी केले. तालुक्यातील शहरी व ग्रामीण महिलांनी यात सहभाग घेतला. तृणधान्यापासून खीर, पकोडे, भाकरी, गुलाब जाम, कतली असे विविध पदार्थ बनवण्यात आले होते.
स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक -नीता निलेश पाटील स्वयंपाकी, जि प शाळा भादली खु
द्वितीय क्रमांक -ललिता पुंडलिक सुतार, स्वयंपाकी -जि प शाळा नांद्रे बु
तृतीय क्रमांक -कविता कैलास पाटील, स्वयंपाकी -जि प शाळा धानवड