भडगाव तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी यांचा पिंपरखेडनजीक भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
संभाजी अहिरे (वय ५१, आडगाव ता. एरंडोल) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, २ मुले असा परिवार आहे. ते मंगळवारी पिंपरखेडकडे मंगळवारी गेले असताना वाटेत त्यांचा रात्री ११ वाजता अपघात झाला. (केसीएन)नातेवाईकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. तपास सफौ हिलाल पाटील करीत आहेत.