• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावकरांच्या मनातील संभ्रम दूर ; जनता कर्फ्यूत जळगाव शहरात काय राहणार सुरू ? काय राहणार बंद ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात जिल्हाधिकार्‍यांनी १२ ते १४ मार्च दरम्यान तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या तीन दिवसांमध्ये नेमके काय सुरू राहणार ? आणि काय बंद राहणार ? याबाबत जळगावकरांच्या मनात संभ्रम आहे. या पार्श्‍वभूमिवर, खास आपल्यासाठी आम्ही याबाबतचे सविस्तर विवरण सादर करत आहोत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जळगाव शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची घोषणा केली. जळगाव शहराच्या हद्दीत ११ मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू होणार असून तो १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपणार आहे. या दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत.

जनता कर्फ्यूत हे असेल बंद – जनता कर्फ्यूमध्ये सर्व शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक संस्था, बाजार, भाजीपाला दुकाने, सलून, सर्व खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनीक कार्यक्रम, किराणा दुकाने, नॉन-इसेन्शीयल या प्रकारातील सर्व दुकाने, दारू दुकाने, बगीचा/उद्याने, पानटपरी, हातगाड्या, सिनेमागृहे, व्यायामशाळा/जीम, तरणतलाव आदी सर्व बाबी बंद राहणार आहेत.

जनता कर्फ्यूत हे असेल सुरू – तर, जनता कर्फ्यूमध्ये वैद्यकीय आपत्कालीन सेवा, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक, बस, रेल्वे व विमानसेवा; नियोजीत परीक्षा असणारी शाळा व कॉलेजेस, बँका व वित्तीय संस्था, कृषी केंद्र, गॅरेज, वर्कशॉप्स, कुरीयर, सर्व प्रकारची माल वाहतूक, कोविड लसीकरण, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. तर शासकीय कार्यालयांमध्ये निम्मे उपस्थिती असावी असे या निर्देशांमध्ये सूचित करण्यात आले आहे. ज्यांना जनता कर्फ्यूमधून सुट दिलेली आहे त्यांनी आपापल्या आस्थापना वा सेवांची ओळखपत्रे सोबत बाळगावीत असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दिनांक १४ मार्च रोजी एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची होणारी परीक्षा ही विहीत वेळापत्रकानुसारच होणार असून विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र ठेवावे असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.


 

 

Previous Post

मुंबईचे शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांना जीवे मारण्याची धमकी!

Next Post

जळगावात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश
1xbet russia

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

May 4, 2026
पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार
Uncategorized

अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

May 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

May 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon