मुंबई (वृत्तसंस्था) – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. हे वाकयुद्ध आता शिगेला पोहोचलं आहे. विधानसभेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडल्यानंतर आता विधानपरिषदेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगना रनौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.


ही नटी ड्रग्ज घेत असल्याचं अध्ययन सुमनने 2016 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं. ही महिला राज्याबद्दल बोलते, तिच्याविरोधात हक्कभंग आला आहे, असं भाई जगताप यावेळी म्हणाले. आता सभापती यावर काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.







