जळगाव (प्रतिनिधी) – येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हद्दपार गुन्हेगार किरण शंकर खर्चे यास जिल्हा न्यायदंडाधिकारी अमन मित्तल यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याला मीरा भाईंदर येथून ताब्यात घेण्यात आले होते. तेथून त्याला पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करणे कामी दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ३ जून रोजी एमपीडीए अन्वये स्थानबध्द आदेश पारीत केले होते. किरण खर्चे (वय ३०, रा. खुबचंद साहित्या नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला १७ गुन्हे दाखल आहेत. सदर स्थानबंद इसमास एमआयडीसी पो.स्टे. पो. निरी. जयपाल हिरे, पोउनि, दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोना सचिन पाटील, पोना योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील तसेच काश्मीरा गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजू तांबे, अविनाश गरजे, संदीप शिंदे, सचिन सावंत, प्रशांत विसपुते अशांनी त्याचा चार दिवस मुंबई येथे शोध घेतला.
मिरा भाईंदर जि. ठाणे येथून ६ जून रोजी त्याला ताब्यात घेवून येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बुधवारी ७ जून रोजी स्थानबद्ध करणे कामी दाखल करण्यात आले आहे. वरील एम. पी.डी.ए. प्रस्ताव हे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पो.निरी.किसन नजनपाटील व त्यांचे अधिनस्त सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ जयंत चौधरी, पोकॉ ईश्वर पाटील अशांनी काम पाहिले.