पहूर ( प्रतिनिधी ) – पहूर जामनेर तालुक्यातील लीहा तांडा येथील महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुरुवार ५ जानेवारी रोजी दुपारी ५ वाजता पहूर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करत आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे २५ वर्षीय महिलाही आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. गुरूवारी ५ जानेवारी रोजी २ वाजेच्या सुमारास गावात राहणारा राम धनराज चव्हाण यांनी विवाहितेच्या घरात घुसून तिचा हात पकडला व माझ्यासोबत चल असे म्हणून तिचा विनयभंग केला. दरम्यान विवाहितेने आरडा ओरड केल्यानंतर संशयित आरोपी राम चव्हाण हा पसार झाला. घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर पिढीचे नातेवाईकांनी तातडीने पहूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राम धनराज चव्हाण यांच्या विरोधात पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत वीरनारे करीत आहे.