पारोळा ( प्रतिनिधी ) – शहरात संशयास्पद स्थितीत भटकणारे ११ इसमांवर पो नि रामदास वाकोडेसह पोलिस यंत्रणेने प्रतिबंधक कारवाई केली आहे,
गणेश चव्हाण ( २६ वर्ष रा कसबे ता जामनेर) , दादाराव चितोडे ( रा अंबडपेठ गल्ली अंबड ता अंबड जि जालना ) , काज्या वासकले , तेवज्या वासले , कमल वासले , राण्या वासले, , अनिल वासले ( रा रसमल ता पाटी मध्य प्रदेश ) , संजय शेमले ( रा गोलपाणी ता पाटी , मध्य प्रदेश ), सोहज्या वासले, दिनेश वासले अशी या संशयितांची नावे आहेत .
पारोळा शहरात भर उन्हात कारण नसताना संशयास्पद स्थितीत भटकतांना पो नि रामदास वाकोडे, स पो नि रवींद्र बागुल, पो उ नि राजू जाधव, हे कॉ महेंद्र मराठे इकबाल शेख, जावेद शेख, पो ना संदीप सातपुते, पो कॉ किशोर भोई, अभिजित पाटील, आशिष गायकवाड यांनी त्यांना विचारपूस केली त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून सर्वांना तहसीलदार यांच्या समक्ष हजर केले असता त्यांचेकडून चांगले वागणुकीचा बॉण्ड लिहून घेतला त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरून स्थानिक पोलिसांकडून त्यांच्या विरोधात आधी काही गुन्हे दाखल आहेत का याची माहिती घेतली जाणार आहे.