चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील इच्छापूर्ती मंदिराजवळील एका हॉटेलच्यामागे अवैध जुगार अड्डा सुरू असल्याचे कळताच नाशिकच्या पथकाने रात्री १ वाजता छापा टाकला. सव्वा लाखाच्या रोकडसह ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल या धाडीत पोलिसांनी हस्तगत केला. व १२ जणांना ताब्यात घेत १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
जळगाव जिल्ह्यात सध्या अवैध धंदे बोकाळले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी विशेष पथकाची निवड केली.हे पथक पेट्रोलिंग करत असताना पो.नि बापू रोहम यांना खबऱ्यांकडून चाळीसगाव तालुक्यातील करगाव रोडवरील इच्छापूर्ती मंदिराजवळील रूबाबदार हॉटेलच्या पाठीमागे अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावर पथकाने रात्री १ वाजता छापा टाकून १,३३,६२० रूपये रोख , दोन पत्याची कॅट, १२,५०० रू. कि.चे ११ मोबाईल फोन व २,२५,००० रूपये कि.च्या ११ मोटारसायकल असा ३,७१,१२० रूपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईमुळे तालुक्यात अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पो.हवा. सचिन धारणकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात म.जु.का.क १२ (अ) प्रमाणे १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकीचे सहा जण अजूनही फरार आहेत.
तत्पूर्वी गुलाब राजपूत (वय-५६), सोमनाथ जाधव (वय-३५), विशाल महाजन (वय-२९), शंकर सोनार (वय-५२), कुणाल पाटील (वय-३३), सोनू गवळी (वय-३६), राहूल चौधरी (वय-२८), अजय भावसार (वय-३३), कपील पाटील (वय-३४), आब्बा चौधरी (वय-३३), हिम्मत चौधरी (वय-३८), भोजराज सावळे (वय- २३) आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले भैय्या सुर्यवंशी, (पूर्ण नाव माहीत नाही), गंपू शेख, संजू घटी, सोनू उर्फ म्हश्या जाधव, महेश राजपूत, बापू मराठे ( सर्व रा. चाळीसगाव) हे फरार आहेत.
ही कारवाई पो नि बापू रोहम, पोहेकॉ रामचंद्र बोरसे, पो.हवा सचिन धारणकर, शेख अहमद, पोना मनोज दुसाने, प्रमोद मंडलीक, कुणाल मराठे व पोकॉ मुकेश टांगोरे या पथकाने केली.