• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून मोदी सरकारवर निशाणा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 6, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेना आणि केंद्र सरकारमध्ये दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या कारणाने शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत,शेतकऱ्यांशी बैठकींचा खेळ खेळणाऱ्या मंत्र्यांना खेलरत्न पुरस्कार मिळायला हवा, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शेतकरी आणि सरकार यांच्यात बैठक होऊनही शेतकरी आंदोलनावर तोडगा न निघणे आणि बळीराजाचे प्रश्न अनुत्तरीतच राहणे ही बाब हेरत केंद्रावर तोफ डागली. इतकंच नव्हे, तर केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचं फक्त नाटक करत असून बैठकींचा हा खेळ सुरु आहे असेही सामनात म्हटले गेले. दिल्लीच्या सीमेवर धडकलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करुनही आठव्या सत्रापर्यंत कोणताच तोडगा निघत नसेल, तर सरकारलाच यामध्ये काही रस नसल्याचीच बाब स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन अशाच प्रकारे सुरु ठेवण्यासाठीचंच हे राजकारण आहे, अशी जळजळीत टीका मोदी सरकारवर करण्यात आली.

शेतकऱ्यांवर दबाव टाकत दडपशाहीचा प्रयोग करणारं सरकार असा उल्लेख अग्रलेखात केल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना अंबानी, अदानी यांचीच भीती असल्याचं म्हणत कृषी कायद्याच्या विरोधात बळीराजा जिद्दीला पेटलेला असतानाच तिथं भाजपचं मोदी सरकार मात्र अहंकारानं पेटलं आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांशी बैठकींचा खेळ खेळणाऱ्या या सरकारमधील मंत्र्यांना खेलरत्न पुरस्कार मिळायला हरकत नाही, असाच सणसणीत टोला सामनातून लगावण्यात आला.

दरम्यान, मागील 40 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारनं लागू केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख चार मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या आहेत. परंतु, शेतकऱ्यांची प्रमुख मागण्या असलेल्या एमएसपीवर लेखी विश्वास आणि तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याबाबत अद्याप सरकारकडून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळं जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत ते आंदोलन सुरुच ठेवणार आहेत.


 

 

Previous Post

हाथरसनंतर युपी पुन्हा हादरले; सामूहिक बलात्कारात आरोपींनी विकृतीची परिसीमा गाठली

Next Post

मनवेल ग्रा. पं. निवडणुकीत ३ उमेदवार बिनविरोध ; १७ जण रिंगणात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनवेल ग्रा. पं. निवडणुकीत ३ उमेदवार बिनविरोध ; १७ जण रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon