• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

धरणगावमध्ये आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प

धरणगाव (प्रतिनिधी) :- येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दि. २० रोजी संपन्न झाला. यावेळी रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, २.५ एकर क्षेत्रात या उपजिल्हा रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून परिसरातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, बधिरीकरण आदी सुविधा मिळणार आहेत. या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शवविच्छेदन, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्ष-किरण, न्यायवैद्यकीय सेवा, नेत्र तपासणी, कुटुंबकल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र आणि संक्रमण प्रतिबंध केंद्र अशा सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

“धरणगाव हे ऐतिहासिक शहर असून, बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या शेजारी ही सुविधा उभारली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणे हा तालुक्यासाठी गौरवाचा क्षण आहे. एकही रुग्ण आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्र आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत म्हसावद दूरक्षेत्र यांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच धरणगाव येथील जुने पोलिस ठाणे आवार हे जीर्ण झाल्याने त्याठिकाणी ५० शासकीय निवासस्थानांच्या बांधकामासाठी अंदाजे १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.


 

 

Tags: #dharangaon news #jalgaon #maharashtra #bharat५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
Previous Post

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जैन कंपनी

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon