बोदवड शहरातील घटना
बोदवड (प्रतिनिधी) : शहरातील युको बँकेच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनातून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड व एटीएम तसेच कागदपत्रे लांबवले. चोरीचा हा प्रकार 17 रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
मोहन काशीनाथ नेरकर (44, नेरकर कॉलनी, मलकापूर रोड, बोदवड) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवार, 17 मे रोजी त्यांनी बोदवड शहरातील युको बँकेच्या आवारात इको कार पार्क केली होती. कारमधील कापडी पिशवीत 50 हजारांची रोकड, आधारकार्ड, दोन एटीएम, दोन बँक पासबुक, दोन किसान के्रडीट कार्ड असा ऐवज होता मात्र चोरट्यांनी ही पिशवीच लांबवली. याप्रकरणी सोमवारी दुपारी नेरकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.