यावल ( प्रतिनिधी ) – डोंगरकठोरा शिवारातील केळीच्या बागातील घड कापून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीला आला यावल पोलीस ठाण्यात तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
नितीन भागवत भिरूड (वय-४४) हे डोंगर कठोरा येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करतात. त्यांचे डोंगरकठोरा शिवारातील गट नंबर ४६८ मध्ये शेत आहे. शेतात केळीची लागवड केली आहे. १४ जुलै रोजी सकाळी नितीन भिरूड हे शेतात पाहणी करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या केळीच्या बागातून घड कापून चोरून नेऊन नुकसान केल्याचे निदर्शनास आले. केळीचे घड नुकसान गावातील लताबाई जगन्नाथ सोनवणे, प्रमिला रघुनाथ थाटे आणि रजनी छगन आढाळे यांनी चोरून नेल्याची तक्रार यावल पोलीसात दिली. या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना किशोर परदेशी करीत आहेत.