एमआयडीसी पोलिस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील चोरटा शहरातीलसुप्रीम कॉलनीत गेल्या तीन महिन्यांपासून राहत होता. या काळात त्याने विविध भागातून ५ दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने हि कामगिरी केली असून चोरट्याला ३ दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.
फैय्याज शकुर मनीयार (वय ३५, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याचेकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याबाबतची गोपनीय माहीती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. ८ दिवसांपासुन टिम तयार करुन त्याचा शोध घेत होते, फैय्याज मनीयार हा जळगाव शहरात असल्याची बातमी मिळाल्यावरुन गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून एमएच १९ सी बी ४०२९, एमएच १८ ९६०२, यासह होंडा ऍक्टिव्हा, हिरो ग्लॅमर, हीरो कंपनीची सुपर स्प्लेंडर अशा १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कारवाई पोउनी दिपक जगदाळे, सफो अतुल वंजारी, पोहेका दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, पोना, किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदिवे, सचिन पाटील, पांका, नाना तायडे, ललीत नारखेडे, किरण पाटील, राजश्री बाविस्कर यांनी कली आहे.