जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका कुंटणखान्यावर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने धाड टाकली. कुंटणखाना मालकीन, दलाल महिलेसह पिडीत महिलेला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“शहरातील एका कॉलनीत कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक तयार करुन पथक कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने त्या कॉलनीत गेल्यावर एक महिला आपल्या घरात कुंटणखाना चालवित होती. या पथकाने बनावट ग्राहक पाठवून त्या ठिकाणी धाड टाकत कुंटणखाना मालकीन महिलेसह दलाल महिला व पिडीत महिला अशा तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रविंद्र गिरासे, सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ मालती वाडीले, अर्चना पाटील, राजश्री बाविस्कर, सुनिल पाटील, किरण धमके, रविंद्र मोतीराया, महेश महाले, मिनल साखळीकर यांच्या पथकाने केली.
कुंटणखाना चालविणारी महिला दलाल महिलेला ग्राहक आणून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येक ग्राहकामागे तिला पाचशे रुपये देत होती. ताब्यात घेतलेल्या तिघही महिला शहरातीलच असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.