चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पोतदार शाळेच्या परिसरातील घरात मध्यरात्री चोरी करतांना एका चोरट्यांला रंगेहात पकडले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र शितोळे (वय-४५) हे चाळीसगावात पोतदार शाळेजवळ कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते गॅरेज काम करून उदरनिर्वाह करतात २ मेरोजी रात्री जेवण झाल्यानंतर महेंद्र शितोळे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. सर्व कुटुंबीय झोपलेले होते. ३ मे रोजी पहाटे महेंद्र शितोळे आणि त्यांचा मावस भाऊ सचिन वाबळे शेतातून घरी आले. महेंद्र यांनी गाईला चारा टाकला व घरात जात असताना त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता एक चोरटा घरात चोरी करताना आढळून आला. महेंद्र आणि सचिन यांनी त्याला पकडून ठेवले. त्याने महेंद्रला जोराचा झटका दिल्याने ते ओट्याखाली पडले. परंतू सचिनने त्याला घट्ट पकडलेले होते. दोघांनी गल्लीत आरोळ्या मारल्याने गल्लीतील सर्वजण जागे झाले. चोरट्याचे नाव विचारले असता पंढरीनाथ जाधव (वय-२५ , रा. हरीगिरी बाबा नगर, चाळीसगाव ) असे त्याने . सांगितले महेंद्र शितोळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पंढरीनाथ जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.