जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील भंगाराच्या दुकानातून शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर रोजी ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी आज अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहनाज गुलाब खान (वय-३९) रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव यांचे गेंदालाल मिल परिसरातील महानगरपालिका कार्यालयाच्या बाजुलाच मुस्कान स्क्रॅप नावाचे भंगाराचे दुकान आहे. शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद केले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ३० हजार रूपये किंमतीचे ३ क्विंटल वायरचे तुकडे, बारीक तांब्याची तार असलेले भंगार चोरून नेल्याचे २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी संशयित आरोपी राजेश अशोक गवळी (वय-२४) रा. गेंदालाल मिल याचा अटक केली असून त्यांच्या ताब्यातील चोरलेले भंगार जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पो.ना. दिपक सोनवणे करीत आहे.







