• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शाल अंगावर घालून कुणी बाळासाहेब ठाकरे होत नसतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – नुसती शाल अंगावर घालून कुणी बाळासाहेब ठाकरे होत नसतो अशी टीका आज पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर केली

पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात शिवसंपर्क अभियानाचा समारोप मेळाव्या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

काही लोकांनी राम, हनुमान या देवतांचा राजकीय स्वार्थापोटी वापर करत पक्षात प्रवेश करुन घेतला भाजपावाल्यांनी तर शिवसेना मुळ विचारापासुन लांब गेल्याची बतावणी करत शिवसेनेला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे. माझ्या जिल्ह्यात माझ्या पक्षाचे पाच आमदार व राज्यात मनसेचा केवळ एकच आमदार आहे. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखी भगवी शाल घातली त्यांनी बाळासाहेब होण्याचे स्वप्न पाहु नये. त्यांचे भोंगे कधीपासुनच बंद झाले , असे सांगत खा. नवनीत राणा यांचेवर टिका करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्या प्रत्येक टी. व्ही. चॅनलवर व वृत्तपत्रांवर एकच चेहरा दिसत असुन नागरिकांनीही तो चेहरा किती वेळा पाहावा.मिडियानेही एखाद्याचे किती कौतुक करावे याबाबतही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

या कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगरप्रमुख शरद तावडे, उपसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, डॉ. हर्षल माने, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, सुनिल पाटील, डॉ. विशाल पाटील, संजय पाटील, विराज तावडे, संजय गोहिल, रमेश बाफना, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, पदमसिंग पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, प्रविण ब्राम्हणे, जावेद शेख, मतिन बागवान, आयुष बागवान, प्रविण ब्राम्हणे, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, शिवदास पाटील, रवि गीते उपस्थित होते.
पालकमंत्री . गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शिवसैनिकांनी राज्यात झालेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेवुन शिवसेनेची बदनामी करणाऱ्यांना जागेवरच उत्तर देण्याची धमक ठेवावी. केंद्र सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव गगणाला भिडले असुन दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे. वाढत्या महागाईपासुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे काही लोक शिवसेनेची बदनामी करत आहेत.यावेळी खा. उन्मेष पाटील यांच्यावर टिका करतांना ना. पाटील म्हणाले की, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या ९ दिवसांत मोठ्या फरकाने निवडुन आणले. मात्र ते माझ्या निवडणुकीचा साधा उमेदवारी अर्जही दाखल करण्यासाठी आले नाही. ते आम्हाला होत नाही तर सर्व सामान्य जनतेला काय होतील. भविष्यातील नगरपालिका , जिल्हा परिषदेच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणूका असुन येत्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची सत्ता ही एकहाती शिवसेनेकडे असेल.

आ. किशोर पाटील, गुलाबराव वाघ, लक्ष्मणराव वडले, संजय सांवत , विष्णु भंगाळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नगरदेवळा, गाळण व शिंदाड येथील वक व महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले.

शिवसंपर्क अभियानानिमित्त आ. किशोर पाटील, लक्ष्मणराव वडले, संजय सांवत, सुमित पाटील, किशोर बारावकर यांचेसह युवा सेनेच्या पदाधिकारी व युवकांनी मोटरसायकल वरुन भगवे झेंडे लावुन महालपुरे मंगल कार्यालयापासुन जारगाव चौफुली, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजे संभाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत मोटरसायकल रॅली काढली होती.


 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

चोरलेले ट्रॅक्टर पारोळा पोलिसांकडून दोन दिवसात जप्त ; चोरटा ताब्यात

Next Post

मुंबई , पुण्याला जाण्याची गरज नाही ; हाडांच्या दुखण्यावर आता जळगावातच उपचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाल अंगावर घालून कुणी बाळासाहेब ठाकरे होत नसतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मुंबई , पुण्याला जाण्याची गरज नाही ; हाडांच्या दुखण्यावर आता जळगावातच उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025
अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !
1xbet russia

अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !

June 23, 2025
बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

खुनाचा उलगडा : प्रॉपर्टीच्या वादातून तरुणाचा खून मामानेच केल्याचे उघड !

June 23, 2025
स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !
1xbet russia

स्नेहलता चुंबळे खून प्रक्ररणात जप्त ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना सुपूर्द !

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025
अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !

अट्टल मोबाइल चोरट्याला अटक,  तपासामध्ये शेतात पुरून ठेवलेले ३३ मोबाईलही काढून दिले !

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon