• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आंतरराष्ट्रीय फलोद्यान परिषदेत निर्मल सिडस् चे संचालक डॉ. जे.सी.राजपुत यांचा “चाई ऑनररी फेलो 2023” पुरस्काराने गौरव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – नवी दिल्ली येथील ले. अमितसिंग मेमोरियल फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेत पाचोरा येथील निर्मल सिडस्‌ चे संचालक डॉ. जे.सी.राजपुत यांना चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) तर्फे “चाई ऑनररी फेलो – 2023” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

दि. 28 ते 30 मे दरम्यान ही आंतरराष्ट्रीय फलोद्यान परिषद जैन हिल्स येथे संपन्न झाली. या परिषदेमध्ये 150 शास्त्रज्ञ आणि 12 आयसीएआर केंद्राचे संचालक सहभागी झाले होते. व्यासपिठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, कृषी शास्त्रज्ञ निवड बोर्डाचे सदस्य डॉ. मेजरसिंग, इस्त्राईल येथील लसून शास्त्रज्ञ एइर इशेल, इस्त्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष डॉ. एच.पी.सिंग, माजी सनदी अधिकारी तथा कृषितज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई, झारखंडच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. विशाल नाथ, फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स इन इंडिया (फाली) च्या संचालिका नॅन्सी बेरी, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आय.एम.मिश्रा, जुनागड कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. ए.आर.पाठक, उत्तर बंगा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एस.के. चक्रवर्ती आदी उपस्थित होते.

यावेळी चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) तर्फे शेतकरी व शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या परिषदेमध्ये पाचोरा येथील निर्मल सिडस्‌चे संचालक डॉ.जे.सी.राजपुत यांना त्यांनी फलोद्यान आणि कृषी क्षेत्रात केलेल्या यशस्वी कार्याबद्दल त्यांना “चाई ऑनररी फेलो 2023” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. जे.सी.राजपुत यांनी जवळपास दोन दशक भाजीपाला तज्ञ म्हणुन काम केले. कोकण कृषी विद्यापिठांतर्गत प्रादेशीक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे 2 वर्ष त्यांनी उद्यानविद्या व सहयोगी संशोधन संचालक म्हणून काम केले. 1998 पासुन ते निर्मल सिडस्‌ पाचोरा येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 30 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या आहेत. डॉ.राजपुत यांचे 2 पुस्तके, 6 बुलेटीन आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स-मॅगझीन मध्ये जवळपास 156 रिसर्च, टेक्नीकल व लोकप्रिय आर्टीकल्स्‌ प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर उद्यानविद्या विषयातील 16 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहीला आहे.

त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 1980 मध्ये नॅशनल सिड कार्पोरेशन नवी दिल्ली तर्फे प्रथम पुरस्कार मिळाला. 1993 मध्ये वसंतराव नाईक मेमोरियल गोल्ड मेडल, आबासाहेब कुबल हॉर्टीकल्चर पुरस्कार, बळीराजा- डॉ. राहुडकर ग्रंथ पारितोषिक, देशदुत कृषी अवॉर्ड तसेच हॉर्टीकल्चर सोसायटी ऑफ इंडिया तर्फे गोल्ड मेडल देऊन त्यांचा गौरव केला आहे.

काल राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये चाई ऑनररी फेलो – 2023 ने त्यांना सन्मानित केल्यामुळे कर्तृत्वाचा सुगंध शब्दांपेक्षा मोठा असतो हे सिध्द झाले. त्यांच्या यशाबद्दल कंपनीचे संचालक डॉ.सुरेश पाटील, श्री. डि.आर.देशमुख, सौ. वैशाली सुर्यवंशी यांच्यासह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

पुरस्कार स्वीकारताना निर्मल सिडस् चे संचालक डॉ. जे.सी.राजपुत


 

Tags: #pachora nirmal sids newshttps://kesariraj.com/30-may-23-n-14/
Previous Post

अभिनेते निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Next Post

वादळी वाऱ्यामुळे ३५२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वादळी वाऱ्यामुळे ३५२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon