जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एसटी वर्क शॉप परिसरात लग्नात आलेल्या तरूणाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
वृषभ राजाभाऊ माहुरकर (वय – २६) हे गेंदालाल मिल, आश्रम शाळेजवळ जळगाव येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २४ एप्रिल रोजी दुपारी मोटारसायकल क्रमांक (एमएच १९, डीडी ८१६५) ने शहरातील नेरी नाका परिसरातील एसटी वर्कशॉपजवळ मीराई लॉन येथे आले. त्या ठिकाणी मोटारसायकल उभी करून लग्नासाठी निघून गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेली सायकाळी लग्न आटोपून घरी निघायच्या तयारीत असताना त्यांना जागेवर मोटारसायकल आढळून आली नाही. त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली . त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. ना. विकास सातदिवे करीत आहेत.