जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील फुपनगरी शिवारातील शेतातून पाईप चोरी करणाऱ्या दोन जणांना पकडले आहे.जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर जाधव (वय-६५) हे फुपनगरी येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे फुपनगरी शिवारातील गट क्रमांक २२ मध्ये शेती आहे. २९ एप्रिलरोजी सकाळी संशयित आरोपी शाहरुख शहा भिकन शहा आणि आरिफ शहा सुलेमान शहा ( दोन्ही रा.गेंदालाल मिल, जळगाव ) हे रिक्षा क्रमांक (एमएच ०३, एएच ५४३४) ने शेतात आले. मनोहर जाधव यांच्या शेतातील ३० नग प्लास्टीक पाईप चोरून नेत असतांना आढळून आले. दोन्ही संशयित आरोपीना मनोहर जाधव यांनी जागेवरच पकडून जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले मनोहर जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शाहरुख शहा आणि आरिफ शहा यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सतिश हारनोळ करीत आहेत.