पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेसमोर सापडुन एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निजामुद्दीनहुन हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशी रेल्वे (क्रं. २०६५८) खाली सापडुन पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे कर्मचाऱ्यानी घटनास्थळ गाठले.तरुणाचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मयताचा उजव्या हातावर एस व सुनिल असे गोंधलेले आहे. सदर इसमाबाबत कुणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राशी संपर्क करावा. घटनेचा तपास ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.