जामनेर (प्रतिनिधी) – खान्देशचे प्रति पंढरपुर म्हणुन प्रसिद्ध असलेल्या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरीचा संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या २७५ वर्षांची परंपरा असलेला वैकुंठ चतुर्दशीला निघणारा रथोत्सव यंदा मात्र करोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. संपुर्ण शहरातुन दिमाखात निघणारा रथ यंदा फक्त ५ पावले ओढण्यात आला.

दुपारी रथाच्या घरात ब्रम्हवृंदांच्या वेदमंत्रोच्चारात,मंगलवाद्यांच्या सुरात दुपारी १२ वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत शारदा भगत,शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजया खलसे, अमृत खलसे,शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख पंडित जोहरे, रजनी जोहरे,नगरसेविका वृषाली गुजर योगेश गुजर यांच्या हस्ते विधीवत पुजा अभिषेक करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, माजी सरपंच सागरमल जैन, शेंदुर्णी सह.जिनिंग प्रेस चे चेअरमन दगडु पाटील, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी ,राजेंद्र पवार, भानुदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड व जि.प.सदस्या सरोजिनी गरुड यांनी रथाचे दर्शन घेतले.
याप्रसंगी तुषार भगत, ह.भ.प.शिवाजी महाराज भगत, ह.भ.प.कडोबा माळी, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोळी, ह.भ.प.भागवत महाराज हिवाळे ,नारायण गुजर,निंबाजी भगत,प्रल्हाद भगत,विठ्ठल महाराज महाले,शिवराम महाले,देवराम महाले,शरद महाले,रमण मिस्तरी,वामन सकट, चोपदार विजय सोनार, गजानन चव्हाण व मान्यवर, भाविक उपस्थित होते.







