
यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील कोरपावली विरावली रस्त्यावर झालेल्या कारने पायी जाणाऱ्या व्यक्तिला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.



या संदर्भात मिळालेली माहीती अशी की फिरोज लतीफ तडवी ( वय – ४८ ) वर्ष राहणार कोरपावली तालुका यावल हे मोलमजुरी करायचे . दिनांक २८ नॉव्हेबर रोजी कोरपावली ते विरावली मार्गावरील रस्त्यावर दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे कोरपावली गावातुन ऑपे रिक्षाने कोरपावली विरावली गावादरम्यान एका शेतात आपल्या कामानिमित्त जाण्यासाठी येत असतांना रिक्शातुन उतरून शेतात जात असतांना यावल कडुन मोहराळा कडे जाणाऱ्या वॅगेनआर कंपनीची एमएच १९डी व्ही७२२९या कारने अचानक धडक दिल्याने झालेल्या अपघातात फिरोज तडवी यांच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाली त्यात त्यांना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले मात्र तडवी यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव येथे घेवुन जात असतांना भुसावळ जवळ वाटेतच फिरोज तडवी हे मरण पावले आहे.
